चिनावल येथील गावात सुरु केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून सध्या २५ ते ३० लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून कंपनीचे विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे किमान २०० लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे.
“शेतकऱ्यांसाठी १६ वर्षात प्रामाणिकपणे केलेल्या येथील कामाची दखल राज्याच्या उद्योग संचालनालयाने घेतली असून आज गणराज्यदिनी जिल्हास्तरावरील लघु उद्योग क्षेत्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन माझा होणारा सन्मान हा सार्या शेतकरी बांधवांचा हितचिंतकांचा आहे. “
– डॉ. प्रशांत सरोदे, उद्योजक महालक्ष्मी बायोजीनिक्स, चिनावल ता. रावेर
चिनावलच्या डॉ. प्रशांत दिवाकर सरोदे या युवकाने उच्च शिक्षणात पदव्युतर व नंतर पीएचडीपर्यंत शिक्षण घेऊन मिळणारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता वडिलांच्या सेवावृत्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चिनावल परिसर व रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना उचक दर्जाचे जीवाणू खते. सूक्ष्म अन्नद्रव्ये व सेंद्रिय खते परिसरातच उपल्ब्ध व्हावीत या दृष्टीकोनातून २००४ मध्ये महालक्ष्मी बायोजीनिक्स कंपनीची स्थापना करीत शेतकऱ्यांना सेवा देण्याचा सुरु असलेल्या प्रयत्नाची राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाने दाखल घेत डॉ. सरोदे यांना लघुउद्योग क्षेत्राचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार त्यांना आज गणराज्यदिनी प्रदान करीत शिरपेचात मनाचा तुरा रोवण्यात येत आहे.
डॉ. प्रशांत सरोदे मूळचे चिनावल येथील रहिवासी असून त्यांचे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी बऱ्हाणपूर येथे वास्तव्य करीत व्यवसायासाठी मध्यप्रदेशातील त्यावेळी मागास समजला जाणारा खामनी परिसर रुग्णसेवेसाठी निवडला होता. प्रशांत सरोदे ७ वीमध्ये असतांना त्यांच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले. व तेथून सरोदे कुटुंबिबांचा खडतर प्रवास सुरु झाला. . बारावोपर्यंत बऱ्हाणपूर येथे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी थेट चिनावल गाठले व पुढील पदवीचे शिक्षण फैजपूर महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण इंदोर येथे पूर्ण केले. कुटुंबाची होणारी आर्थिक फरफट कमी व्हावी म्हणून त्यांनी फैजपूरच्या महाविद्यालयात सहाव्यक प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. मात्र यात त्यांचे समाधान झाले नाही. शिक्षणाचा उपयोग केवळ आपल्याला पगार मिळावा हा नसून वडिलांच्या सेवावृत्तीचा पगडा असलयाने त्यांनी भावी आयुष्य शेतकऱ्यांसाठी देण्याचे ठरवले व २००४ मध्ये त्यांनी महालक्ष्मी बायोजीनिक्स कंपनीची स्थापना केली.
लहान भाऊ भूपेंद्र हा अर्थाजनासाठी एका कृषी कंपनीच्या मार्केटिंगचे काम करीत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना विक्री केल्या जाणार्या जीवाणू खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे माहिती घेतली .त्यात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक लक्षात आली. व भाऊ भूपेन्द्रशी चर्चा करतांना शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी कंपनीची स्वत स्थापना करावी असे ठरले. यासाठी आई श्रीमती नीता सरोदे पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असे डॉ. सरोदे सांगतात.
महालक्ष्मी बायोजीनिक्सची उत्पादने निर्माण करीत ती शेतकऱ्यां पर्यंत पोहचवीत असताना तालुक्यातलीच नव्हे तर राज्यातील व मध्यप्रदेशातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांची थेट संपर्क आला आहे. केवळ पैसा कमावणे हा उद्देश नसून शेतकऱ्यांना दिलो जाणारी सेवा व विविध माहितीचा उपयोग त्यांच्या विकासासाठी होत असल्याने समाधान वाटते.
डॉ. सरोदे यांचे कुटुंब एकत्रित असून आई नीता, पत्नी रुपाली, लहान भाऊ भूपेंद्र, त्याची पत्नी भावना, तसेच जळगाव येथील बहिण भावना नेमाडे तिचे पती रवींद्र नेमाडे, मित्र तुषार कोल्हे, डॉ. मकरंद राणे, जितेंद्र पवार, गुणवंत नेमाडे यांची कायम मोलाची साथ लाभली असून सर्वजण नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असतात. कंपनीचे कामकाज करतांना अनेकवेळा चढउतार आले त्यावेळी पत्नी रुपाली मात्र सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याने धीर मिळाला. तर भूपेन्द्रच्या हिमतीने अनेक ठिकाणी यशस्वीरीत्या पोहचू शकलो असे ते सांगतात. कंपनीतील हिरामण वानखेडे, महेंद्र गाढे, हेमंत पाटील, रवोंद्र पाटील, अमोल नेमाडे, अमोल खलसे,यांच्यसह सर्वच कर्मचारी परिश्रम घेत असल्याने कंपनीला यशस्वीतेकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे.