डॉ. प्रशांत सरोदे यांना लघुउद्योगाचा पुरस्कार

राज्याच्या उद्योग संचलनालयातर्फे लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना दिला जाणारा सन २0१७ चा जळगाव जिल्हा लघूउद्योग क्षेत्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार चिनावल येथील महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ. प्रशांत सरोदे यांना प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक देण्यात करण्यात आला. यावेळ आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे ,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार मिळवणारे डॉ. सरोदे चिनावल येथील रहिवाशी असून त्यांनी इंडस्ट्रीयल मैक्रोबायोलॉजी या विषयातून विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच टि केळो,कापूस, गहू, हरबरा या पिकांवर होणार्‍या सूक्ष्म जीवाणूंचा होणारा परिणाम यावर संशोधन करीत डॉ. सरोदे यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे. शेतकऱ्यांच्या विकासासठी त्यांनी महालक्ष्मी बायोजीनिक्स कंपनीची २00४ मध्ये स्थापना करीत या व्यवसायाला शेतकरीभिमुख केले आहे. २0१७ पासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत.